मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम – अतुल भातखळकर
कोरोना रुग्णाचा उद्रेक होत आहे . कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. महाराष्ट्र आता लॉकडाउनच्या उंबरठ्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून कलम १४४ लागू होणार आहे अशी घोषणा केली . याची कडक अंमलबजाणी करण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्याच्या या फेसबुक लाईव्हवरून विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्र्याना प्रश्न विचारले आहेत. मुख्यमंत्री महोदयांचे FB live म्हणजे नेहमी प्रमाणे 'कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन है सोल्युशन का पता नही' या थाटाचे होते. मदतीच्या नावाखाली लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम त्यांनी केले आहे. परिस्थिती इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री पंतप्रधानांकडे मदत मागण्यासाठी वाट कोणाची पाहत होते? असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्र्याना केला.
उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून पंधरा दिवस १४४ लागू राज्यात पुढील 15 दिवस राज्यात संचारबंधी पुढील एक महिना शिवभोजन थाळी मोफत<परवानाधारक रिक्षावाल्यांना १५०० रुपये गरजूंना ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ रेस्टॉरेंट्स आणि हॉटेल्समध्ये फक्त पार्सल सेवा सुरू राहणारतात्काळ मदतीसाठी 3 हजार 300 कोटी राखीवखावटी योजनेतील आदिवासी कुटुंबातील लोकांना २००० रुपये मिळणाररस्त्यावरच्या खाद्य विक्रेत्याला सकाळी 7 ते 8 खाद्य विकण्याची मुभा.