‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ पार्श्वभूमीवर उजनी धरणाला आकर्षक रंगाची विद्युत रोषणाई
देशाला स्वातंत्र होवून येत्या 15 ऑगस्ट रोजी 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र दिनानिम्मित संपूर्ण देशात आझादी का अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. देशातील प्रमुख पर्यटन स्थळांना तिरंगा रंगाची आकर्षक विद्दुत रोषणाई करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर येथील उजनी धरणाला रोषणाई करण्यात आली आहे. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक या ठिकाणी प्रचंड गर्दी करत आहेत. धरणातून 40 हजार क्युसेकने सध्या विसर्ग सुरु आहे. या पैकी वीजगृहात 1600 क्युसेक तर नदीपात्रात 1600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. सध्या उजनी धरण 102.67 टक्के म्हणजेच 118.67 टीएमसी भरलेले आहे.
राज्यात विविध भागात पावसाची दमदार हजेरी
राज्यात अनेक ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे, पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.