Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक

Megablock: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक

आज 7 जुलै रोजी मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवार हा सुट्टीचा दिवस असतो. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी विविध कामांच्या निमित्ताने मेगा ब्लॉक असतो. त्यामुळेही उद्याचा दिवसही मुंबईकरांसाठी महत्त्वाचा आहे. आज 7 जुलै रोजी मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकल रद्द, तर काही विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वेने रविवारी ठाणे ते दिवा आणि कुर्ला ते वाशीदरम्यान ब्लॉक जाहीर केला आहे. मात्र, रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही. ब्लॉक वेळेत रेल्वेरूळांसह सिग्नल व्यवस्थेची देखभाल-दुरुस्ती करण्यात येते. ब्लॉकमुळे काही लोकल रद्द राहणार असून, काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.

मध्य रेल्वे

कुठे : ठाणे ते दिवा या मार्गावर

कधी : सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत

परिणाम : या ब्लॉकमुळे सकाळी 9.46 ची सीएसएमटी ते बदलापूर, सकाळी 10.28 ची सीएसएमटी ते आसनगाव, दुपारी 3.17 ची कल्याण ते सीएसएमटी या जलद लोकल धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. सकाळी 9.50 ची वसई रोड- दिवा मेमू कोपरपर्यंत चालवण्यात येणार आहे. तर कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यानच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तसेच 11.45 ची दिवा-वसई रोड मेमू कोपरवरून चालवण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी-दिवा जलद पॅसेंजर पनवेलपर्यंत चालवण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे

कुठे : कुर्ला ते वाशी या मार्गावर

कधी : सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत

परिणाम : या काळात सीएसएमटी – पनवेल/बेलापूर अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशीदरम्यान काही विशेष लोकल चाववण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

पश्चिम रेल्वे

कुठे : शनिवारी मध्यरात्रीनंतर 12.15 ते रविवारी पहाटे 4.15

कधी : वसई रोड ते विरार

परिणाम : या ब्लॉकच्या काळात वसई रोड ते विरार स्थानकांदरम्यानच्या सर्व धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच ब्लॉकदरम्यान काही लोकल रद्द करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com