उदय सामंत हल्याप्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखासह 5 जणांना न्यायालयीन कोठडी

उदय सामंत हल्याप्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखासह 5 जणांना न्यायालयीन कोठडी

आरोपी जामीनासाठी आज अर्ज करणार; सोमवारी होणार जामीन अर्जावर सुनावणी
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे : राज्यात राजकीय गोंधळ सुरु असताना शिवसेनेतील वाद आणखीच उफाळत चालला आहे. या गोंधळा दरम्यान शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात कात्रज येथे शिवसैनिकांनी हल्ला केला होता. कात्रज चौकामध्ये सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, हल्ल्यानंतर तात्काळ पोलिसांकडून आरोपींचा शोध घेऊन अटक करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांकडून शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह ६ जणांना अटक करण्यात आली होते. यानंतर आरोपींना आज (६ ऑगस्ट) रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

उदय सामंत हल्याप्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखासह 5 जणांना न्यायालयीन कोठडी
मुख्यमंत्री शिंदेंनी डिवचले! शिवसेनेचा 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख

उदय सामंत प्रकरणी आरोपींना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केल्यानंतर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सर्व सहा आरोपींना न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची कोठडी संपल्याने आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने सर्व सहा आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. माहितीनुसार, आरोपी आजच जामिनासाठी अर्ज करणार आहेत. या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

उदय सामंत हल्याप्रकरणी शिवसेनेच्या शहरप्रमुखासह 5 जणांना न्यायालयीन कोठडी
भंडारा जिल्ह्यातील ३५ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार

अशी घडली होती घटना ?

उदय सामंत हे मोहम्मद वाडी येथील कार्यक्रम संपवून शिवसेना नेते तानाजी सावंत यांचे कात्रज येथील घराजवळ आले होते. याच चौकाजवळ आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आलेली होती. उदय सामंत यांचा ताफा कात्रज येथे आला असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी ओळखली व त्यानंतर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. पोलिसांनी वेळीच परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं, यामुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यामध्ये उदय सामंत यांना कोणतीही दुखापत झाली नाही. उदय सामंत यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षकांच्या तीन गाड्या होत्या. तसंच स्थानिक पोलिसांच्या पायलट व्हॅनही सामंत यांच्या ताफ्यात होत्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com