शेतीच्या वादातून केळगावात पाच जणावर अॕट्रासिटी दाखल

शेतीच्या वादातून केळगावात पाच जणावर अॕट्रासिटी दाखल

Published by :
Published on

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील केळगाव येथे शेतीच्या वादात पाच जणावर अॕट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निलंगा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीना पोलिसानी अटक केली आहे.

निलंगा तालुक्यातील केळगाव येथील शेतशिवारातील रस्त्यावर लक्ष्मीबाई शञूघन कांबळे यांना आरोपी लक्ष्मण ज्योतिराम पाटील, किशन रमेश पाटील अन्य तिघांनी हे शेत आमचे आहे. तुमचा आमच्या शेतावर काय अधिकार असे म्हणत वाद करत जातीवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या वादात लक्ष्मीबाई शञूघन कांबळे जखमी झाले. या संबधित फिर्याद निलंगा पोलिस ठाण्यात शञूघन लहू कांबळे यानी दिली असून सदर घटनेचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कराण्यात आला आहे. पाचही आरोपींना निलंगा पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास निलंगा पोलीस करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com