“नवाब मलिक काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात”
वाब मलिक काही तरी बोलायचं म्हणून बोलतात, असं वक्तव्य भाजपाचे आमदार अशिष शेलार यांनी केलं आहे. सरकार काम करत नसल्याने राज्यपालांना हस्तक्षेप करावा लागत आहे. राज्यपाल नियमात राहून काम करत आहेत, असे ते म्हणाले.
राज्यपालांच्या मराठवाडा दौऱ्यावरून चर्चा सुरू आहे. राज्यपालांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबतही आढावा बैठकांचे नियोजन केले आहे. यानंतर महाविकास आघाडी सरकारने थेट नाराजी दर्शवली आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील राज्य सरकारची बाजू मांडताना राज्यपाल सरकारच्या अख्यारीतील मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचं सांगितलं.
'अदानी'च्या बोर्डावरून टोला
छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळ अदानी समुहाकडे हस्तांतराचा प्रस्ताव हा ठाकरे सरकानेच केला. ठराव संमत करताना छत्रपतींचे नाव कमी न करता बाकी करण्याची काळजी सरकाने का घेतली नाही,असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. बाहेर जाऊन बोर्डवर हुल्लडबाजी करणारे शिवसैनिक, हे टक्केवारीचं आंदोलन करत आहेत. अदानी आणि शिवसेना यांची मिलीभगत असल्याची टीका शेलारांनी केली आहे.