Aryan Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पंच प्रभाकर साईल विरोधात पोलिसात तक्रार

Aryan Khan प्रकरणात नवा ट्विस्ट, पंच प्रभाकर साईल विरोधात पोलिसात तक्रार

Published by :
Published on

नमित पाटील, पालघर | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात आर्यन खानचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेचं सध्या संशयाच्या भोवर्यात सापडले आहेत. या संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वानखेडेबाबत नवनवीन खुलासे करत असतानाच आता साक्षीदार प्रभाकर साईलने वानखेडेबाबत मोठे आरोप केले आहे. या आरोपांचे प्रकरण ताजे असतानाच आता प्रभाकर साईल विरोधात पालघर पोलिसात लेखी तक्रार दाखल करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे.

एनसीबीच्या या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची सेटलमेंट झाल्याचा दावा केला होता. त्यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप केला होता. या आरोपांनंतर समीर वानखेडे अडचणीत सापडले आहेत.

या प्रकरणाला आला नवे वळण आले आहे. के .पी . गोसावी याचा अंगरक्षक आणि पंच असलेल्या प्रभाकर साईल पुरावा म्हणून सॅम डिसुझाचा नामक दिलेला फोटो आणि नंबर इतर दुसर्या व्यक्तीचा असल्याचा आरोप एका व्यक्तीने केला आहे. हेनिक बाफना असे त्या व्यक्तीचे नाव आहे. या व्यक्तीने सॅम डिसुझा म्हणून दिलेला फोटो आणि नंबर माझा असल्याचा पालघर मधील हेनिक बाफना यांचा दावा आहे. तसेच प्रभाकर साईलने आपली ट्विटर आणि समाज माध्यमांवर बदनामी केल्याची तक्रार हेनिक बाफना यांनी पालघर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com