Sharad Pawar
Sharad PawarTeam Lokshahi

Sharad Pawar : 'आधी आमदार मिटकरी यांना बेड्या ठोका मगच बैठक'

शरद पवारांसोबतच्या बैठकीस ब्राम्हण समाजाचा विरोध
Published by :
Team Lokshahi
Published on

पुणे : ब्राम्हणाविरोधी आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ब्राम्हण समाजासोबत बैठक आयोजित केली आहे. परंतु, या बैठकीस अनेक संघटनांनी विरोध केला आहे. आधी आमदार अमोल मिटकरी (Amol mitkari) यांना बेड्या ठोका मगच समाजाची बैठक, अशी भूमिका घेतली आहे.

Sharad Pawar
Nawab Malik : नवाब मलिक अडचणीत, डी-गँगशी संबंधाबाबत कोर्टाचे निरीक्षण...

पुण्यातील बांधवांनी बैठकीला जाऊ नये : राम कुलकर्णी

जेष्ठ पत्रकार, प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हणाले की, ब्राह्मण समाजाविषयी नेहमीच द्वेषाची भावना ठेवणारे शरद पवार आज समाज बांधवांसोबत पुण्यात बैठक घेत आहेत. माझे त्यांना एकच आवाहन आहे की, काही दिवसांपूर्वी तुमचे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजावर जाहीरपणे विषारी टीका केली होती. परंतु, त्यावर शरद पवार गप्प बसले, त्यांच्याविरोधात असंख्य तक्रारी देऊनही मिटकरींवर गुन्हा नोंद झाला नाही. खरंतर आधी आमदार मिटकरी यांना बेड्या ठोका आणि मगच समाजाच्या बैठकीला या, असे त्यांनी सांगितले आहे. एवढेच नाहीतर पुण्यातील बांधवांनी बैठकीला जाऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Sharad Pawar
15 दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा...,राणा दाम्पत्याला पालिकेचा इशारा

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकरांच्या पुढाकारातून ही बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत २० ते २२ ब्राह्मण संघटना उपस्थित राहणार असल्याचे समजते. या बैठकीसाठी पोलीस बंदोबस्त (Police Security) तैनात करण्यात येणार आहे. या बैठकीनंतर राज्यातील तणावपूर्ण वातावरण निवळण्यास मदत होईल, अशी आशा राष्ट्रवादीने केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com