अर्णब गोस्वामींना हक्कभंग समितीचं समन्स
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग समितीने समन्स बजावला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल केला होता. यानुसार समन्स बजावल्यानंतर आता अर्णब गोस्वामी यांना उद्या बुधवारी हक्कभंग समितीसमोर हजर रहावे लागणार आहे.
अर्णब गोस्वामी यांनी माध्यम स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रताप सरनाईक केला होता. तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी याच्या विरोधात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. यानुसार हक्कभंग समितीने या आधी नोटीस बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र अर्णब गोस्वामी गैरहजर राहिले होते.
दरम्यान आता पुन्हा अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग समितीने समन्स बजावला आहे. यानुसार समन्स बजावल्यानंतर आता अर्णब गोस्वामी यांना उद्या बुधवारी सायंकाळी 5 वाजता हक्कभंग समितीसमोर हजर रहावे लागणार आहे. गोस्वामी विरोधात आमदार प्रताप सरनाईक यांची साक्ष नोंदविण्यात येणार आहे