पालघर जिल्ह्यातील वसई-विरार मध्ये आर्किटेक्चर शिक्षणाची सुवर्णसंधी !
विरार: कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) ने पहिल्यांदाच दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 3 वर्षांचा पूर्ण-वेळ आर्किटेक्चर डिप्लोमा कोर्स सुरू केला आहे. या कोर्समुळे 10 वी नंतर विद्यार्थ्यांना आर्किटेक्चर सारख्या सर्जनशील क्षेत्रात व्यवसाय करण्याची संधी मिळते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना या व्यावसायिक क्षेत्रात आर्किटेक्चरल फर्म आणि इंटिरियर डिझायनिंग फर्ममध्ये नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होतील.
कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने महाराष्ट्र राज्यातील एकंदरीत 20 संस्थांना आर्किटेक्चरमधील विविध डिप्लोमा कोर्स सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. मान्यता मिळालेल्या सगळ्या संस्था ह्या महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाशी (MSBTE) संलग्न आहेत.
विवा स्कूल ऑफ आर्किटेक्चर ही पालघर जिल्ह्यातील वसई-विरार विभागातील एकमेव शिक्षण संस्था आहे. ज्यात शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून आर्किटेक्चर डिप्लोमा कोर्स सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने प्रथम वर्ष आर्किटेक्चरच्या प्रवेशासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रता प्रवेश परीक्षा NATA-4 च्या तारखा पुढे ढकलून विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची संधी दिली आहे. NATA-4 ची नोंदणी 22 ऑगस्ट 2023 पासून सुरू झालेली असून 17 सप्टेंबर 2023 रोजी ही परीक्षा होणार आहे. आर्किटेक्चर कौन्सिलने 12 वी उत्तीर्ण किंवा डिप्लोमा विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष देखील शिथिल केले आहेत. पात्रता निकष नियम कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहेत.
विवा स्कूल ऑफ आर्किटेक्चर कॉलेज हे केवळ पालघरमधीलच नाही तर मुंबईतील आर्किटेक्चर शिक्षणासाठी उपलब्ध असलेले सर्वात मोठे कॅम्पस आहे. कॉलेज विरार पूर्व मधील शिरगाव ठिकाणी वसलेले आहे. हे कॉलेज निसर्गरम्य अश्या वातावरणात असल्याने शहरातील गजबजलेल्या वातावरणापासून व अन्य प्रदूषणापासून दूर आहे. संस्था अधिकारीमंडळ यांना अपेक्षित असलेल्या सर्व पायाभूत सुविधांनी सुसज्ज आहे.
संस्थेमध्ये विद्यार्थ्याच्या अंगी असलेल्या सर्वांगीण शैक्षणिक कलागुणांना वाव देण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी शिक्षकवर्ग नेहमी तत्पर असतात.
प्रवेश संदर्भातील अधिक माहितीसाठी कॉलेजच्या http://www.vivaarch.org/ अधिकृत वेबसाईटवर तसेच 7447491000 / 7744871000 या क्रमांकावर कार्यलयीन वेळेत संपर्क साधू शकता.