महाराष्ट्र
6 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांसाठी ‘कोवॅक्सिन’ला मंजूरी
केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती
DCGI ने (ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया) आज ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी भारत बायोटेकच्या कोवॅक्सिनच्या मर्यादित वापरास परवानगी दिली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीटद्वारे या संदर्भात माहिती दिली.
भारताच्या कोविड विरोधातील लढाईला आता आणखी बळकटी. ६ ते १२ वयोगटासाठी ‘कोव्हॅक्सिन’चे दोन डोस, ५ ते १२ वयोगटासाठी ‘कॉर्बेव्हॅक्स’ आणि १२ वर्षांवरील वयोगटासाठी ‘ZyCoV-D’ चे दोन डोसला आपत्कालीन परिस्थितीत प्रतिबंधित वापरास मंजूरी देण्यात आली आहे, असे मनसुख मांडविया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
याचबरोबर DCGI ने लस उत्पादकास पहिल्या दोन महिन्यांसाठी दर १५ दिवसांनी योग्य विश्लेषणासह प्रतिकूल घटनांच्या माहितीसह सुरक्षितता डेटा सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत.