Appalal Shaikh Passes Away | महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचे निधन
संजय पवार | राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कुस्तीत सुवर्णपदक मिळवून देणारे, 1992 साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे, ज्यांचा सन्मान शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन करण्यात आला ते पै आप्पालाल शेख यांचं निधन झालं आहे. मूत्रपिंडाच्या आजाराने त्यांचे निधन झालं आहे. मृत्यू समयी ते 55 वर्षाचे होते.त्यांच्या अकाली जाण्याने लाल मातीवर शोककळा पसरली आहे.
भल्या भल्या पैलवानांना आस्मान दाखवणाऱ्या आप्पालाल शेख यांना आजारामुळे जमिनीवर पाठ टेकवता येत नव्हती. त्यांना मूत्रपिंडाचा आजार होता. गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पैलवान आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी आहेत. त्यांच घर पैलवनाचे घर म्हणून ओळख होती.
आप्पालाल शेख यांच्या घराला कुस्तीचा वारसा आहे.आप्पालाल शेख यांचे बंधू इस्माईल शेख हे 1980 सालचे महाराष्ट्र केसरी होते.त्यांच्यापाठोपाठ 1992 साली आप्पालाल शेख हे महाराष्ट्र केसरी झाले.2002 साली त्यांचे पुतणे मुन्नालाल शेख हे देखील महाराष्ट्र केसरी झाले.एकाच घराण्यामध्ये तीन तीन महाराष्ट्र केसरी असलेले राज्यातील आप्पालाल शेख यांचे एकमेव कुटुंब होते.त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये मजल मारत तेथे देखील सुवर्णपदक पटकावले होते.