अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकरांनी केली जिजाऊ स्मारक परिसराची स्वच्छता!

अंजलीताई आंबेडकर आणि सुजात आंबेडकरांनी केली जिजाऊ स्मारक परिसराची स्वच्छता!

राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या, अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते, सुजात यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी अकोला शहरातील एकमेव जिजाऊ सभागृह परिसराची स्वच्छता केली.
Published by :
Team Lokshahi
Published on

अकोला | राजमाता जिजाऊ माँ साहेब जयंती दिनाचे औचित्य साधून वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या, अंजलीताई आंबेडकर आणि युवा नेते, सुजात यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी अकोला शहरातील एकमेव जिजाऊ सभागृह परिसराची स्वच्छता केली. अकोला शहरातील राजमाता जिजाऊ सभागृहाची स्वच्छता केल्यानंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून शहरभरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवली गेली.

मागील अनेक दिवसांपासून या सभागृहाची अवस्था दयनीय झाली होती. शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडीने अकोला शहरात साफसफाई मोहीम राबवली.

यासाठी शहरातील 21 मुख्य चौकात स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. इन्कम टॅक्स, तुकाराम चौक, कोलखेड चौक, सिंधी कॅम्प, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान, डाबकी रोड, गांधी चौक, टॉवर चौक, सिविल लाईन्स चौक, मोठी उमरी चौक, अण्णाभाऊ साठे रेल्वे स्टेशन चौक, हनुमान चौक, जठारपेठ चौक, शिवाजी पार्क चौक, जवाहर नगर चौक, शिवनी चौक रतनलाल प्लॉट चौक, महाकाली/ नेहरू पार्क, शिवर चौक या ठिकाणी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com