Ratnagiri
Ratnagiri Team Lokshahi

Ratnagiri : माणसांपेक्षा मुकी प्राणी वफादार

मालकाच्या आठवणीत त्याच्या कुत्र्याने प्राण सोडला
Published by :
shamal ghanekar
Published on

आजच्या युगात माणसांपेक्षा मुके प्राणी इमानदार आणि वफादार आसतात. म्हणून कुत्रा (Dog) हा ईमानदार प्राणी म्हटले जाते. आणि त्यांना केलेली मदत ते कधीही विसरत नाही. ते आपल्या मालकासाठी काहीही करायला तयार असतात. अशी एक घटना रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यामधील चिपळूण (Chiplun) तालुक्यातील अलोरे (Alore) गावात घडलेली आहे. दोन दिवसापूर्वी कोळकेवाडी धरणांमध्ये चार जण बुडाल्याची घटना घडली होती. त्यातच आता अलोरेमधील सुजय गावठे (Sujay Gawthe) आणि त्याचा लाडका कॅस्पर नावाचा कुत्रा हे दोघे एकत्र धरणावर गेले होते. अशातच आता कॅस्पर कुत्र्याचा मालक सुजय हा पाण्यामध्ये बुडत असल्याची घटना घडली. सुजय बुडत असल्याचे पाहून मदतीसाठी कुत्रा मोठमोठ्याने भुंकू लागला. त्याने मालकाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. आणि त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करू लागला. पण कॅस्पर कुत्र्याचे प्रयत्न असफल ठरले.

Ratnagiri
कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील यंदाचा महाराष्ट्र केसरी

कॅस्पर कुत्रा आपल्या मालकाला बुडत असताना वाचवण्याचे प्रयत्न असफल ठरल्याने तो खचून गेला. घरी आल्यावर कॅस्पर हा खूप शांत झाला. त्याला एक आशा होती की, त्याचा मालक परत घरी येईल. परतुं त्याचा मालक घरी परत न आल्याने कॅस्पर जेवण सोडले होते. तो त्याच्या मालकाची वाट पाहत बसायचा. मालक बुडत असताना त्याला वाचवू न शकल्याने त्याला सदमा बसला होता. त्यामुळे कॅस्पर हा खूप शांत झाल्याचे पाहू मालक सुजयच्या घरच्यांनी कॅस्परला बाहेर फिरण्यासाठी घेऊन गेले होते.

Ratnagiri
Ratnagiri
Ratnagiri
महाराष्ट्र केसरी विजय चौधरींचा पंजाबच्या हिंदकेसरीला धोबीपछाड

कॅस्परला परत घरी घेऊन आल्यावर कॅस्पर कुत्र्याने घराच्या अंगणातचं मान टाकली. आणि त्यानेही आपले प्राण सोडले. जिथे मालक तिथे कॅस्पर. म्हणजे जिथे मालक सुजय तिथेच त्याचा लाडका कॅस्पर कुत्रा, असे त्याचे एक समीकरण बनले होते. दोन दिवस उलडून गेले तरी मालक सुजय न सापडल्याने कॅस्परनेही त्याच्या आडवणीत स्वत: चा जीव सोडला. कॅस्पर कुत्र्याचे म्हणजेच या वफादार कुत्र्याचे सोशल मिडियावर (Social Media) त्याच्या वफादारीचे कौतुक होत आहे. आणि सोशल मिडियावर त्याचे मिम्स (Mims) तयार केले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com