अनिल देशमुखांचे जावई CBIच्या ताब्यात

अनिल देशमुखांचे जावई CBIच्या ताब्यात

Published by :
Published on

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे.वरळीतील सुखदा येथून गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती लोकशाही न्यूजला सुत्राकडून मिळाली आहे. अनिल देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. एकूण 10 जणांच्या टीमनं ही कारवाई केल्याचं कळतंय. दरम्यान, देशमुख कुटुंबियांकडून चतुर्वेदी यांच्या अपहरणाचा आरोप केल्याचं सांगण्यात येत आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांच्यासह वकील आनंद डागा याना सीबीआयने ताब्यात घेतले. धक्कादायक म्हणजे ते गाडीतून जात असताना गाडी थांबवली आणि सीबीआयची टीमने वरळीतील सुखदा येथून गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे त्यांना याआधी कोणतेही समन्स बजावलं नव्हतं.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com