महाराष्ट्र
अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज सुनावणी
अनिल देशमुखांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात आज वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला तसंच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि महाविकास आघाडी सरकारने दाखल केलेल्या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे.
राज्य सरकारने दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांनी याचिका दाखल केली आहे. अनिल देशमुखांविरोधातील FIR रद्द होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.