अनिल देशमुखांची संपत्ती ईडीकडून जप्त; जयंत पाटील म्हणाले…
प्रशांत जगताप | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. या कारवाईवर आता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. धादांत खोटं आणि बदनाम करण्याचे हे षडयंत्र असून, ज्यांना राज्यात पुन्हा सत्ता मिळवायची आहे, अशीच लोक प्रयत्न करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
ईडीच्या कारवाईने राष्ट्रवादी बँक फूटवर गेली नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी जयंत पाटील यांनी दिले. त्याचसोबत राज्यातील मंत्र्यांना अडचणीत आणायचे, त्यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लावायचा, असे करून सरकारला पाडण्यासाठी काही कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. ईडीची कारवाई याचाच भाग असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
पुढे ते म्हणाले, आमचे कोणतेही सहकारी दोषी नाहीत. ईडी आणि सीबीआयने ज्या चौकशा केल्या आहेत त्याचा तपशील त्या सोयीस्कर रित्या जाहीर करत असल्याचेही पाटील म्हणाले.
तसेच धादांत खोटं आणि बदनाम करण्याचे हे षडयंत्र असून, या मागचा करता करविता कोण आहे हे सगळ्यांना माहितच आहे. ज्यांना राज्यात पुन्हा सत्ता मिळवायची आहे, अशीच लोक प्रयत्न करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.
अनिल देशमुखांच्या संपत्तीवर जप्ती
अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे.