Anil Deshmukh
Anil Deshmukh

अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Published by :
Published on

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने ही कोठडी सुनावली आहे. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

मनी लॉड्रिंग आणि भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी सुरू असून त्यांच्या सीबीआय कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण विशेष न्यायालयाने अनिल देशमुख यांची सीबीआय कोठडीची याचिका फेटाळली आहे. चारही आरोपींना आता 29 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेल्या अनिल देशमुखांची ईडीने मनी लाँड्रिंग आरोपांतर्गत चौकशी सुरु केली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com