कसाबच्या 12 नंबरच्या कोठडीत होते अनिल देशमुख; सांगितला भयानक अनुभव

कसाबच्या 12 नंबरच्या कोठडीत होते अनिल देशमुख; सांगितला भयानक अनुभव

लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांची मुलाखत झाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

वर पाहा संपूर्ण मुलाखत

लोकशाही मराठीच्या पॉडकास्ट विथ कमलेश सुतार या कार्यक्रमामध्ये अनिल देशमुख यांची मुलाखत झाली. या मुलाखतीमध्ये अनिल देशमुख यांनी मोठं गौप्यस्फोट केलं आहेत. या मुलाखतीमध्ये अनिल देशमुख यांनी जेलमध्ये असतानाचा अनुभव सांगितला आहे. अनिल देशमुख म्हणाले की, जेव्हा मला जेलमध्ये ठेवण्यात आले ती कोठडी 12 नंबरची. अजमल कसाबला ज्या १२ नंबरच्या कोठडीत ठेवले, त्याच कोठडीत मला ठेवण्यात आले होते. ती बिल्डींग लोखंडी पत्राने झाकली होती. मी याची लेखी तक्रार दिली होती. ​जेलमधील अनुभवावर मी पुस्तक लिहणार आहे. ​संजय राऊत आणि माझी अनेक वेळा ऑर्थर रोड जेलमध्ये भेट व्हायची. असे देशमुख म्हणाले.

यासोबतच त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर बोलले आहेत. अनिल देशमुख म्हणाले की, ​परमवीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले. खोट्या आरोपात मला फसविण्यात आले. ​पोलीस आयुक्त या प्रकरणाचा मास्टर माइंड होता हे धक्कादायक होतं. माझ्यावर आरोप लावल्यावर काही भाजपचे नेते माझ्याकडे आले. माझ्याकडे त्यांनी चार मुद्द्यांचा एक कागद आणून दिला. काही लिहून द्यायला सांगितले, ते जर मी लिहून दिले असते तर उद्धव ठाकरे सरकार ३ वर्षांपूर्वी पडले असते. मी लिहून देण्यास नकार दिला, त्याच्या दुसऱ्या दिवशी सीबीआयची रेड झाली. मी लिहून दिलं असते तर अटकेचा प्रश्नच नव्हता. लिहून दिले असते तर मी मंत्री झालो असतो. ​जो व्यक्ती माझ्याकडे ड्राफ्ट घेऊन आला त्या व्यक्तीचे ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉडिंग आहे. जर मी काही मुद्दे सांगितले तर फार मोठा धमाका होईल. भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा जवळचा माणूस माझ्याकडे अनेक वेळा आला होता. असा गौप्यस्फोट केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com