संत्र्याच्या पिकवीमा हप्त्यावरून शेतकऱ्यांमध्ये संताप, माजी कृषी मंत्री अनिल बोंडेंचा हल्लाबोल
विदर्भात संत्र्याच मोठं उत्पादन घेतलं जातं. मात्र आता राज्य सरकारमुळे संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. प्रधानमंत्री पिक विमा योजनांतर्गत पुनसंचित हवामान आधारित फळपीक विमा संत्रा पिकांचा आंबिया बहर तिप्पट महागला आहे.
यामुळे विमा कंपनी तर्फ शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत असल्याचा आरोप केला जात आहे. अमरावती जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकरी आपला विमा प्रती हेक्टर 4 हजार रुपये प्रमाणे काढत होते. मात्र यंदा ही रक्कम 4 हजार वरून तब्बल 12 हजार रुपये प्रती हेक्टर भरावी लागणार आहे. यासंदर्भात परिपत्रक जाहीर झालं आहे.
शेतकऱ्याचा पाच टक्के असतं आणि उर्वरित हिस्सा राज्य सरकारने भरायचा असतो. परंतु या महाविकास आघाडी सरकारने स्वतःच्या अंगावर आलेला हिस्सा सुद्धा शेतकर्यांच्या अंगावर टाकला आहे आणि त्यामुळे संत्रासाठी पीक विमा काढला.
त्यामुळे शेतकऱ्यांना संतापाची लाट पसरली आहे. असा आरोप माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला आणि म्हणून या संत्राला वाचवण्याकरता राज्य सरकारने स्वतःच्या अंगावर विम्याचा हप्ता द्यावा आणि शेतकऱ्याला पूर्वरीत पूर्वीप्रमाणे चार हजार रुपये प्रतिहेक्टर फक्त प्रीमियम देण्यात यावा, अशी मागणी माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली.