मोठी बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

मोठी बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित

राज्यभरात दीड महिन्यापासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपाला आज तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.
Published on

मुंबई : राज्यभरात दीड महिन्यापासून विविध मागण्यांसाठी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपाला आज तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सुरू असलेल्या संपाबाबत महिला आणि बाल विकास सचिव यांच्या कक्षात आज बैठक पार पडली. यानंतर संपास तूर्तास स्थगित दिली आहे.

मोठी बातमी! अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप स्थगित
नाना पटोलेंना आघाडीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार नाही; 'त्या' पत्रावर आंबेडकरांचं उत्तर

मानधनवाढीसह अन्य मागण्यांसाठी 4 डिसेंबरपासून अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र, सरकारकडून दुर्लक्ष होत असल्‍याने प्रलंबित मागण्यासंदर्भातील अंगणवाडी सेविकांनी बुधवारी बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना निवेदन दिले होते. तर, आज अजित पवार यांच्या नागपूर येथील विजयगड बंगल्याबाहेर अंगणवाडी सेविका आंदोलनाला बसल्या होत्या.

अशातच, महिला आणि बाल विकास सचिव यांच्या कक्षात आज बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने सुरू असलेला संप तूर्तास स्थगित केला आहे. याबाबत अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे निमंत्रक दिलीप उटाणे यांनी माहिती दिली. दरम्यान, 26 जानेवारीपासून सर्व राज्यातील अंगणवाडी कर्मचारी कामावर रुजू होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com