अमरावतीमध्ये उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

अमरावतीमध्ये उड्डाणपुलावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

Published by :
Published on

अमरावाती: राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी अपक्ष आमदार रवी राणा यांनी अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता.छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा आता महानगरपालिकने हटवला आहे. आमदार रवी राणा यांनी विना परवानगी शिवरायांचा हा पुतळा बसविला होता. विनापरवानगीने राजापेठ येथील उड्डाणपुलावर शिवाजी महाराजांचा बसवलेला पुतळा आज पहाटे प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आला.

काल रात्री राजापेठ उड्डाणपुलाचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आणि त्यानंतर हा पुतळा हटविण्यात आला. हा पुतळा महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने काढला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये अशी मागणी युवा स्वाभिमान पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती.या पुतळ्यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या घरासमोर पोलीस आणि एसआरपीएफचा मोठा बंदोबस्त लावून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

अमरावती महापालिकेत भाजपची सत्ता आहे. या पुतळ्याला महापालिकेने परवानगी द्यावी अशी मागणी आमदार रवी राणा यांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेत केली होती. पुतळ्यावरून जिल्ह्यात राजकारण चांगलेच तापले असून यात शिव प्रतिष्ठानने सुद्धा उडी घेतल्याचे समजते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com