फोटोचा दाखला देत सरकारचं अपयश लपवण्याचे काम, शेलारांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

फोटोचा दाखला देत सरकारचं अपयश लपवण्याचे काम, शेलारांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

Published by :
Published on

भाजप नेते आशिष शेलार हे रझा अकादमीच्या कार्यालयात गेले होते. तिथे त्यांनी रझा अकादमीच्या नेत्यांसोबत मिटिंग केली. हा षडयंत्राचा भाग होता का? हे माहीत नाही. पण शेलार रझा अकादमीच्या कार्यालयात गेले होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपांवर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिक यांना मी मराठीतील ती म्हण पुर्ण सांगणार नाही पण तुमची खोड काही जात नाही, एवढे मात्र खरे.अशा पद्धतीने दरवेळेला वेगवेगळ्या प्रकारच्या फोटोंच्या जीवावर अफवांचे राजकारण करणं हा तुमचा धंदा झाल्याचा टोला शेलार यांनी मलिकांना लगावला आहे. त्रिपुराच्या घटनेनंतर महाराष्ट्रात घडलेली दंगलींचा आणि सन 2016 -17च्या फोटोचं संबंध काय? असा सवाल देखील आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

माझ्या या फोटोचा रझा अकादमीच्या फोटोशी संबंध काय? ही बैठक रझा अकादमीच्या कार्यालयात झालेली नाही. जुन्या कुठल्यातरी फोटोचा दाखला देऊन आजच्या दंगलीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारच्या अपयशाला लपवण्याचे काम तुम्ही करू नका. तुमची खोड जात नसेल तर असे असंख्य फोटो रझा अकादमी सोबतचे आम्हाला दाखवावे लागतील तेव्हा तुम्हाला तोंड दाखवायला जागा उरणार नाही असा इशारा देखील शेलार यांनी दिला. महाराष्ट्र विकास आघाडीने आणि राष्ट्रवादीनेहे फोटोचं राजकारण बंद करावे असेही शेलार म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com