अमरावती मनपाची भाजपला 4.80 लाखांची देणगी, महापौरांनी दावा फेटाळला

अमरावती मनपाची भाजपला 4.80 लाखांची देणगी, महापौरांनी दावा फेटाळला

Published by :
Published on

अमरावती महापालिकेने भाजपला 4.80 लाख रुपये देणगी दिल्याचे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या संस्थेच्या अहवालात करण्यात आला आहे. 2019-20 या काळात भाजपला 20 हजार कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या असून, स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून अमरावती महापालिकेने राजकीय पक्षाला देणगी का दिली असा सवाल उपस्थित झाला आहे.

मात्र, अमरावतीच्या महापौर चेतन गावंडे यांनी हा दावा तथ्यहीन आल्याचे म्हटले आहे. 2019 मध्ये कोल्हापूरला पुराचा तडाखा बसला होता. त्यावेळी कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना अमरावती महापालिकेतील सर्व सदस्यांनी एक महिन्याचे मानधन मदत निधी म्हणून देण्यासंदर्भात 16 ऑगस्ट 2019 च्या सर्वसाधारण सभेसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

तर आता भाजपला पक्ष निधी नाही, अशी माहिती महापौर चेतन गावंडे यांनी दिली अमरावती मनपावर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी सत्तेचा गैरवापर करून भाजपला पक्ष निधी देऊन मनपाला चुना लावल्याचा आरोप मनपावर होत आहे. यावर महापौर यांनी स्पष्टीकरण दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com