amravati municipal corporation
amravati municipal corporationTeam Lokshahi

Amravati Election Reservation 2022 : महिला आरक्षणामुळे काहींचे सदस्यत्व धोक्यात तर काहींना फायदा

33 प्रभागातील 98 सदस्यांसाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर
Published on

सुरज दहाट | अमरावती : राज्यात महापालिका निवडणुका काही महिन्याच्या अंतरावर असताना अमरावती महानगरपालिकेची (Amravati Municipal Election) आज आरक्षण सोडत जाहीर झाली. आज महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर (Pravin Ashtikar) यांनी महानगरपालिकेच्या संत ज्ञानेश्वर नाट्यगृहात जाहीर केली. यात 49 जागा महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

अमरावती महानगरपालिकेची 33 प्रभागातील 98 सदस्यांसाठी आज आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 17 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी 9 अनुसूचित जातीतील महिलांसाठी व 2 जागा अनुसूचित जमातीपैकी 1 जागा महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे, 39 जागा ओपन महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या.

मागील निवडणुकीत 22 प्रभागातून 87 सदस्य निवडून आले होते. तर यावेळी 33 प्रभागातून 98 सदस्य निवडून दिले जाणार आहेत. तर अमरावती मनपात 11 प्रभागासह 11 नगरसेवक वाढले आहेत. यातच महिला आरक्षणामुळे काही सदस्यांचे सदस्यत्व धोक्यात आले आहे. तर काहींसाठी मात्र ही आरक्षणाची सोडत व प्रभाग रचना सोयीची झाल्याने फायद्याची ठरणार आहे

अमरावती महानगरपालिका पक्षीय बलाबल

भाजप - 45

शिवसेना - 7

काँग्रेस - 15

एमआयएम - 10

बीएसपी - 5

रिपाई (आठवले गट) - 1

स्वाभिमानी पार्टी - 3

अपक्ष - 1

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com