पोलीस कस्टडीत आरोपी मृत्यू प्रकरण; राजापेठ ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी

पोलीस कस्टडीत आरोपी मृत्यू प्रकरण; राजापेठ ठाणेदाराच्या निलंबनाची मागणी

Published by :
Published on

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्या प्रकरणी गुन्ह्यात 25 वर्षीय सागर ठाकरे नामक आरोपीने अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीतच शर्टच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. यात नातेवाईकांनी ही आत्महत्या नसून पोलीस मारहाणीत मृत्यू झाला असा आरोप नातेवाईकांनी केला होता.

यातील मृत आरोपी सागर ठाकरे यांच्या नातेवाईकांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत पोलीस कोठडीत आत्महत्यास कारणीभूत असणारे राजापेठ पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावर ३०६ नुसार सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना पोलीस खात्यातून निलंबित करण्याची मागणी केली.

तर सदर प्रकरणाचा तपास हा सीबीआय करत असून यात एक पोलीस कर्मचारी सुद्धा निलंबित झाला आहे. आता थेट ठाणेदार मनीष ठाकरे यांच्यावरच कारवाईची मागणी केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com