Raigad Landslide | “महाडमध्ये मदत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील”

Raigad Landslide | “महाडमध्ये मदत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील”

Published by :
Published on

मागील तीन दिवसांपासून राज्यातील कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. याचसोबत पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक ठिकाणे पाण्याखाली गेल्याने आपल्या घराच्या किंवा इमारतीच्या छतावर येऊन थांबा आणि बचाव पथकाच्या हेलिकॉप्टरकडे मदत मागा, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. तसेच, मुंबईहून NDRF आणि नौदलाचे डायव्हर तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या परिस्थितीची दखल घेत ट्वीट केले.

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळल्याने जी दुर्घटना घडली आहे ती अत्यंत दु:खद आहेत. या संदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि NDRF चे व्यवस्थापकीय संचालक यांच्याशी संवाद साधला आहे. NDRF चे पथक मदत आणि बचावकार्य करत आहे. केंद्र सरकार लोकांचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ती मदत करत आहे, असे ट्वीट करत त्यांनी रायगडच्या पूरपरिस्थितीची दखल घेतली आणि महत्त्वाची माहिती दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com