महाराष्ट्र
Ambadas Danve : देशातील आर्थिक पाहणी अहवालातून काही गंभीर बाबी समोर आल्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी निर्मला सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सीतारामन यांनी आर्थिक वर्ष 2023-24 चा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता अंबादास दानेव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अंबादास दानवे म्हणाले की, देशातील आर्थिक पाहणी अहवालातून काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. देशातील ४३.३ टक्के लोकांना उपजीविका देणाऱ्या, जीडीपीत १२.८ वाटा असणाऱ्या कृषी क्षेत्राचा विकास दर हा अवघा १.४ टक्के इतका खाली आला आहे.
यासोबतच ते म्हणाले की, केवळ किसान सन्मान योजनेचा फार्स दाखवून आता चालणार नाही. निवडणूक संपल्या आहेत, त्यामुळे २०४७ वगैरेचा भंपकपणा भाजपने आता बंद करावा. आजच्या दिवशीची वानवा असलेल्या शेतकऱ्याला २०४७ च्या गोष्टी सांगणे हे त्यासाठी निव्वळ मृगजळ आहे. असे अंबादास दानवे म्हणाले.