धक्कादायक! हापूसच्या नावाखाली केमिकल फवारणी करून कर्नाटकी आंब्यांची विक्री

धक्कादायक! हापूसच्या नावाखाली केमिकल फवारणी करून कर्नाटकी आंब्यांची विक्री

आंबांच्या फसवणुकीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ
Published on

विकास मिरांगे | नवी मुंबई : उन्हाळा सुरु झाला कि आंब्यांचा मोसम सुरु होतो. वर्षातून एकदाच हा हापूस आंबा चवीला मिळतो. आंबे खावे तर कोकणातलेच. अनेकदा आपण देवदगडच्या आंब्यांची पेटी खरेदी करतो. पण, पेटीमधला आंबा हा नक्की देवगडचाच आहे का? याची खात्री आपण कधी करत नाही तर याबाबत शंका देखील उपस्थित करत नाही. आंबा लवकर पिकवण्यासाठी केमिकलचा फवारणी करून ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरु आहे.

धक्कादायक! हापूसच्या नावाखाली केमिकल फवारणी करून कर्नाटकी आंब्यांची विक्री
गुलाबराव पाटलांच्या आव्हानाला दानवेंचे प्रतिआव्हान; शिंदे गटाच्या सभा होतील, मग तुम्ही बघाच

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमधे तुम्ही आत प्रवेश केल्याने तुम्हाला प्रत्येक गाळ्यावर हापूस आंबाच्या पेट्या गाळयामध्ये थप्पी लावून दिसणार. मात्र यामध्ये नक्की हापूस आंबा आहेत का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आंबा हंगामात मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये जवळपास ६० टक्के व्यापाऱ्यांनी आपले गाळे भाडेतत्वावर दिले आहे. व्यापाऱ्यांनी एका गाळ्यात २ ते ४ माणसे बसवले असताना महिन्यात २ ते ४ लाख रुपये भाडे वसुली करतात. सध्या फळ मार्केटमध्ये आंबाच्या हंगामात ४ महिन्यासाठी बंगाली टोळीने मार्केट काबीज केला आहे. ही टोळी देवगडच्या पेटीत कर्नाटकी आंब्यांची विक्री करीत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी कॅरेटमधून कर्नाटकी कच्चे आंबे हे गाळ्यात उतरवल्यानंतर देवगडच्या लाकडी आणि कागदी पेट्यांमध्ये इथरेलजी फवारणी करून देवगड हापूस आंबा पेटी तयार केली जाते आणि गाळ्यांमध्ये या पेटीचा साठा केला जातो. यानंतर दोन दिवसांमध्ये हा हिरवागार आंबा पिवळा धमक होतो. त्यानंतर लगेच याची विक्री केली जाते. हा खेळ संपूर्ण रात्रभर गाळ्याच्या अवती भवती सुरु असतो. ग्राहकांना देवगडचाच आंबा हवा पण देवगडच्या आंब्यांची आवक कमी असल्याने एपीएमसी मार्केटमधील देवगड आंब्यांच्या पेटीत कर्नाटकी आंबा भरून ग्राहकांची फसवणूक केली जाते आहे.

इथरेलद्वारे पिकवलेला आंबा हा वरुन पिवळा दिसतोय. वरवर पाहता हा आंबा आकर्षक दिसतो. मात्र याची चव तुरट आंबट लागते. चवीसोबतच नागरिकांच्या आरोग्यासोबतचही खेळ केला जातोय. रायपनिंग चेम्बरमध्ये इथरेलच्या फवारणीसाठी मान्यता आहे. परंतु, तयार आंब्यावर केली जाणारी केमिकलची फवारणी अत्यंत घातक आहे. यावर संचालक आणि अन्न औषध प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. हा आंबा खाल्ल्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे, मळमळ होणे, गुंगी येणे, झोप लागणे आणि मानसिक तणावासोबतच चेतनासंस्थेवर परिणाम होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे तुम्ही तर आंबा खरेदी करताना चौकशी करूनच खरेदी करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com