अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात

Published by :
Published on

 आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. साहित्यिकांसाठी पर्वणी असलेल्या साहित्य संमेलनाची वाट वाचक, रसिकांनाही तितकीच असते.

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. कोरोनामुळे साहित्य संमेलनाचा मार्च आणि नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त हुकला होता. आता डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सावट आलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. 

वादावर कसेबसे मार्ग काढत संमेलन अंतिम टप्पात आले आणि काल सकाळपासूनच नाशिकमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळं साहित्य संमेलनाच्या मुख्य सभा मंडपात पावसाचे पाणी साचलंय, त्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. पावसाने जोर धरल्याने कवी कट्टा आणि बालकाव्य हे दोन कार्यक्रम खुल्या जागेतून सभागृहात घेतले जाणार आहेत. पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं साहित्यिकांसह रसिकांचीही मोठी गैरसोय होणार असून उपस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

94 व्या साहित्य संमेलनादरम्यान पाळावे लागणार नियम
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे.  ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या  50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com