Ajit Pawar in Vidhansabha
Ajit Pawar in Vidhansabha

वाईनविक्रीच्या निर्णयाचा अजित पवारांकडून पुनरूच्चार

Published on

आज राज्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असताना विधानसभेमध्ये अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी व विरोधकांकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार ह्यांनी आज सभागृहातील भाषणादरम्यान किराणा दुकानात वाईनविक्रीच्या निर्णयावरून अजित पवारांनी (Ajit Pawar) काही आकडेवारी मांडली तर विरोधकांना काही गोष्टींची आठवणही करून दिली.

काय म्हणाले अजित पवार?
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री (Ex CM Devendra Fadnavis) असताना त्यांच्या सरकारने घरपोच दारू (Liquor Home Delivery) पोहोचवण्याचा विचार केला. त्यावेळी आपल्यावरही टीका झाली हे आपणही अनूभवलं आहे. तर देशाचा विचार केला असता महाराष्ट्रात (Maharashtra) 1 लाख लोकसंख्येमागे 1.5 मद्यविक्रीची दुकानं आहेत, कर्नाटकात (Karnataka) 1 लाखांमागे 7 दुकानं आहेत तर, उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) 2.5 दुकानं आहेत. आपला महाराष्ट्र हा साधू-संतांचा महाराष्ट्र आहे हे खरं आहे, त्यामुळे मी आजपर्यंत दारूच्या थेंबालाही स्पर्श केलेला नाही. परंतू, ह्या सगळ्याव्यतिरीक्त राज्याच्या उत्पन्नाचाही विचार करावा लागतो. दारूवरील कर आम्ही कमी केला हे खरं आहे. पण ह्या मागचं कारण महाराष्ट्रातील लोक कर कमी असलेल्या ठिकाणी गेल्यावर तिथून मद्याच्या बाटल्या घेऊन यायचे त्या गोष्टीला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ह्या निर्णयानंतर राज्याला मद्यविक्रीतून होणारा नफा 100 कोटीवरून 300 कोटींकडे गेला आहे. हे सगळं खरं असलं तरीही अजून हा निर्णय अमलात आणलेला नाही."

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com