कुणाच्या किती बायका सांगू का?,असे विचारत अजित पवारांकडून मुंडेंची पाठराखण
लोकशाही न्यूज नेटवर्क
धनंजय मुंडे प्रकरण शमत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. त्याच प्रमाणे केंद्र सरकारने ओबीसी जनगणना, कृषी कायद्यांवर त्यांनी निर्णय घ्यावा. आम्ही राज्यात कृषी कायदे लागू करणार नाही, असे मत देखील अजित पवार यांनी मांडले.
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झालेली तक्रार त्या महिलेनेचे मागे घेतली आहे. भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका करत आहेत. 'आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय', अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिला आहे. ते पुण्यामध्ये झालेल्या नियोजनच्या आढावा बैठकीमध्ये बोलत होते.
धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये . सर्वांच्या वैयक्तिक आयुष्यबद्दल आम्हला माहित आहे? असा इशारा देखील अजित पवार यांनी यावेळी दिला .
पंकजा मुंडे यांनी केलेल्या ओबीसी जनगणनेच्या प्रश्नावरदेखील पवारांनी भाष्य केले. जनगणना करायची की नाही हा निर्णय केंद्र सरकारचा आहे. तो लोकसभेचा अधिकार असून केंद्राने याबाबत निर्णय घ्यावा. लोकसभेतच ही मागणी झाली होती आणि ही खूप जुनी मागणी असल्याच्या अजित पवार यावेळी म्हणाले.