अभिनेत्री ‘कंगना’च्या विधानाचं समर्थन करत अभिनेते विक्रम गोखले नेमकं काय म्हणाले…?
अभिनेते विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने सन्मान सोहळा आयोजित करणात आला आहे.पुण्यातील दुधाणे लॉन्स परिसरात हा सन्मान सोहळा सुरू आहे. यावेळी अभिनेते विक्रम गोखले यांनी देशाचं राजकरण तसंच सध्याच महाराष्ट्रातील राजकारण यावर भाष्य केलं.त्याचप्रमाणे त्यांनी यावेळी बॉलिवू़ड अभिनेत्री कंगना रणौतने देशाच्या स्वातंत्र्यवरून केलेल्या विधानाला देखील पाठींबा दर्शवला आहे. यासोबतच त्यांनी देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामचं देखील कौतुक केलं.
यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विक्रम गोखले म्हणाले की, होय, कंगना रणौतच्या विधानाशी मी सहमत आहे. त्यावेळी देशासाठी फासावर जाऊ दिलं गेलं, त्यांना वाचवता आलं असतं पण त्यावेळी राजकारणात वाचवलं गेलं नाही, असं म्हणत अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाच्या विधानाचं समर्थन केलं. पुढे ते म्हणाले की, माझ्या दृष्टीने बाबासाहेब या देशाला कळले नाही, आंबेडकर मोठे व्यक्तिमत्त्व होते. त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.
लाल बहादूर शास्त्री सोडून आत्तापर्यंतच्या देशातील सर्व पंतप्रधानांना शंभराच्या खाली मी गुण देतो. लाल बहादूर शास्त्री यांची जयंती ही २ ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो.हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे. जे ७० वर्षात झालं नाही ते मोदींनी केलं, पक्षाचे काम सर्व करतात, पण ते देशासाठी मोदी चांगलं काम करतात, असही ते म्हणाले.