संगमनेर,अकोले तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

संगमनेर,अकोले तालुक्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

Published by :
Published on

दुध उत्पादकांना मोठ्या आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागले आहे. आज लॉकडाउन उघडून सुद्धा दुधाचे दर काही वाढवण्यात आले नाही, परिणामी दूध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत आहे. ज्या पद्धतीने पेट्रोल डिझेलचे दर वाढून केंद्र सरकार महागाई वाढत आहे पण शेतकऱ्यांचे दुधाचे दर वाढ होत नाही ही फार मोठी शोकांतिका असल्याचे आंंदोलकांनी सांगितले. याच विरोधात शेतकरी संघर्ष समिती महाराष्ट्र व शेतकरी संघटना यांच्या वतीने दूध दरवाढ करावी याविषयी दूध संकलन केंद्रावर आंदोलन करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील मंगळापुर येथे तर अकोले तालुक्यात विविध ठिकाणी दगडा रुपी सरकारला दुधाचा अभिषेक घालून दरवाढ करण्याविषयी जोरदार घोषणाबाजी दिल्या आहेत.

आज आम्ही फक्त विनंती करतोय दगडाला अभिषेक घालून आम्ही झोपलेल्या सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करतोय, सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नये अशी आक्रमक भूमिका शेतकऱ्यांनी घेतलीेये. दूध उत्पादक शेतकऱ्यां तर्फे शासनाला निवेदन देण्यात आले हे निवेदन मंडल अधिकारी संगमनेर यांना देण्यात आले यावेळी दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणे उपस्थित होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com