Lokshahi Impact । ‘लोकशाही’च्या बातमीनंतर प्रांताधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Lokshahi Impact । ‘लोकशाही’च्या बातमीनंतर प्रांताधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Published by :
Published on

नाशिकमध्ये प्रांताधिकाऱ्यांनी महिला तलाठ्याकडे शरीरसुखाची मागणी केल्याची बातमी लोकशाही न्यूजने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेतली गेली असून आता प्रांताधिकारी सोपान कासार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येवला पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

नाशिकमध्ये महसूल विभागात धक्कादायक प्रकार समोर आला होता. महिला तलाठ्याकडे प्रांताधिकाऱ्याची शरिरसुखाची मागणी केली होती.तर दुसऱ्या महिला तलाठ्याकडे 60 हजारांची मागणी केल्याचे वृत्त लोकशाही न्यूजने प्रसिद्ध केले होते. तसेच या घटनेत जर महिलांनी या मागण्या मान्य केल्या नाही तर प्रांताधिकारी कडून महिलांना बदलीचे देखील धमकी देण्यात आल्याचे वृत्त होते.आता या प्रकरणात छगन भुजबळ लक्ष घालणार का? असा सवालही लोकशाही न्यूजने उपस्थित केला होता.

लोकशाही न्यूजच्या या बातमीच्या काही तासांतच प्रशासन खडबडून जागे झाले. आणि आता तलाठी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या उपविभागीय प्रमुख सोपान कासार यांच्यावर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला. -354 अ 504 प्रमाणे – येवला पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com