महाराष्ट्र
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह, संपर्कात आलेल्यांना काळजी घेण्याचे आवाहन
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. एकीकडे लसीकरण सुरू असताना कोरोना रुग्णांची वाढणारी ही संख्या चिंता करण्यासारखीच आहे. राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोना झाल्याचे उघड झाले आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली आहे.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी व चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की, कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या, असे ट्विट त्यांनी केले आहे.
विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात त्यांचे वडील आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि रश्मी ठाकरेंच्या मातोश्री यांनी देखील लस घेतली. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते.