it raid
it raid

IT Raid : ‘मातोश्री’च्या निकटवर्तीयांवर आयकर विभागाची छापेमारी

Published by :
Shweta Chavan-Zagade
Published on

शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरावर आयकर विभागाचे (income tax department) धाड सत्र सुरु असतानाच आता शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी छापेमारी सुरू आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय, शिर्डी देवस्थानाचे विश्वस्त आणि युवासेनेचे पदाधिकारी राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या घरी आयकर विभागाने छापा मारला आहे. यासह वादग्रस्त आरटीओ (RTO) अधिकारी बजरंग खरमाटे, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिर्डी देवस्थानचे विश्वस्त राहुल कनाल तसेच सदानंद कदम (Sadananda Kadam) यांच्या निवासस्थानी आयकर खात्याचे छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे.

या छापेमारीदरम्यान केंद्रीय राखीव दलाची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहे. मुंबईच्या वांद्रे (bandra) येथील नाईन अल्मेडा इमारतीमधील निवासस्थानी ही छापेमारी सुरु आहे. तर मुंबईपाठोपाठ पुण्यातही आयकर विभागाचे धाड सत्र सुरु केले आहे.

मात्र या छापेमारीदरम्यान राहुल कनाल घरी होते की नाही याची माहिती अद्याप समोर आली नाही. तसेच हे धाडसत्र किती दिवस आणि किती वेळ चालणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. तसेच कोणत्या प्रकरणासंबंधीत हे धाडसत्र सुरु आहे याची माहिती देखील स्पष्ट झालेली नाही.

आयकर विभागाने एकाच दिवशी शिवसेनेशी (shivsena) संबंधीत तीन वेगवेगळ्या नेत्यांच्या घरी छापेमारी केल्याने शिवसेनेचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. तर दुसरीकडे आज शिवसेना खासदार संजय राऊत तपास यंत्रणांच्या या धाडसत्रावर शिवसेना भवनात जाहीर पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे संजय राऊत या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com