मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समूहाकडे

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समूहाकडे

Published by :
Published on

जीव्हीके कंपनीकडून आता मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा अदानी समूहाने घेतला आहे. याबाबतचं निवेदन कंपनीने प्रसिद्ध केलं आहे

मागील वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुप सोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे असणारा ५०.५ टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचं निश्चित झालं होतं. त्याचप्रमाणे कंपनीने मुंबई विमानतळामध्ये वाटा असणाऱ्या दोन दक्षिण आफ्रिकन कंपन्यांशीही करार करुन त्यांच्याकडील २३.५ टक्के वाटा आपल्या नावावर करण्याचाही करार केला होता.

"विमानतळ पर्यावरणस्नेही करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे विमानतळ परिसरात संबंधित व्यवसायांना चालना देण्यासाठी प्रयत्न करू. यामध्ये मनोरंजन, ई-कॉमर्स यासारख्या संकल्पनांचा समावेश आहे." असं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी एका निवेदनात म्हटलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com