अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा; अदानी-हिंडनबर्ग एसआयटी चौकशीची नाही गरज
देशात आणि भारतीय शेअर बाजारात खळबळ उडवून देणाऱ्या अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणाची स्वंतत्र चौकशी करायची की नाही याचा निकाल सुप्रीम कोर्ट आज निकाल देणार होते. अदानी समूहाला सुप्रीम कोर्टाचा दिलासा मिळाला आहे.
सुप्रीम कोर्टाने सांगितले की, अदानी-हिंडनबर्ग एसआयटी चौकशीची गरज नाही. आंतरराष्ट्रीय अहवालावर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाही. शेअर बाजाराशी संबंधित नियमावली करणं हे सेबीचं काम आहे. असे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. त्यामुळे या संबंधिचा तपास एसआयटीकडे देण्याची गरज नाही असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.
अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्म हिंडनबर्गनं गौतम अदानींच्या सर्व कंपन्यांबाबत अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये अनेक गंभीर आरोप केले होते. तर अदानी समूहानं हा अहवाल पूर्णपणे खोटा असल्याचं सांगितले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले.