Traffic Police
Traffic Police Team Lokshahi

दंडात्मक कारवाई दरम्यान खासगी मोबाईल वापरल्यास पोलिसांवर होणार कारवाई, परिपत्रक जारी

अपर पोलीस महासंचालक कुलवंत के सारंगाल यांनी जारी केलं परिपत्रक
Published by :
Sagar Pradhan
Published on

राज्यतील सर्वच नागरिकांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर येत आहे.वाहतुकी दरम्यान चालकांकडून काही चुकी झाल्यावर, त्यानंतर कारवाई करण्याच्या वेळेस वाहतूक पोलिसांनी प्रोटोकॉलचा भंग केल्यास संबंधीत पोलिसांना कारवाईला सामोरं जावं लागणार आहे. राज्याचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत के सारंगाल यांनी या संबंधित परिपत्रक जारी केलं असून वाहनचालकांवर कारवाई करताना पोलिसांनी खासगी वाहन वा त्यांच्या खासगी मोबाईल न वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन न झाल्यास पोलिसांवर कारवाई होणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले आहे.

Traffic Police
शिंदे सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार लवकरच, धनुष्यबाण शिंदेचाच - रामदास कदम

या आहेत परिपत्रकात सूचना ?

कारवाई करताना फोटो काढण्यासाठी खाजगी मोबाईलचा वापर करू नये. जर पोलिसांनी खाजगी मोबाईल वापरला तर आता कारवाई होणार आहे.

वाहतूक पोलिसांनी फक्त चलान मशिनद्वारेच फोटो काढणे अपेक्षित आहे. असं न झाल्यास संबंधित पोलिसांवर कारवाई होणार.

दंडात्मक कारवाई करताना खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो वा चित्रीकरण करून पोलीस काही कालावधी नंतर ई चलान मशिनमध्ये फोटो अपलोड करतात. सोबतच पूर्ण गाडीचा फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटचे फोटो टाकतात. त्यामुळे गाडी ओळखणे अशक्य होते.

पोलीस अधिकारी अंमलदार यांचेकडील ई चलान मशिनबाबत काही समस्या, अडचणी असल्यास तशी तक्रार द्यावी अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com