ठाण्यात मेट्रोच्या कामात असुरक्षा; चालत्या कारवर पडली सळई

ठाण्यात मेट्रोच्या कामात असुरक्षा; चालत्या कारवर पडली सळई

मेट्रोचे काम सुरु असताना एक सळई वरुन खाली पडून चालत्या कारमध्ये आरपार घुसली आहे.
Published on

ठाणे : ठाण्यात एक विचित्र घटना घडली आहे. मेट्रोचे काम सुरु असताना एक सळई वरुन खाली पडून चालत्या कारमध्ये आरपार घुसली आहे. ठाण्यातील तीन हात नाका येथील ही घटना असून सुदैवाने चालक बचावला आहे. यामुळे ठाण्यातील मेट्रोच्या कामामधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

ठाण्यात मेट्रोच्या कामात असुरक्षा; चालत्या कारवर पडली सळई
लोकसभेसाठी शिरूरमधून अमोल कोल्हेंवरच शिक्कामोर्तब?

तीन हात नाका येथं मेट्रोच काम सुरू असून त्याखालून वाहनांची सतत वर्दळ सुरु असते. आज सकाळी 11 च्या सुमारास अचानक वरून एक सळई खालून जाणाऱ्या कारमध्ये आरपार घुसली. सुदैवाने कारचालकाला कुठलीही गंभीर दुखापत झाली नाही. वाहतूक पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक कोंडी होण्याआधीच ती कार तिथून बाजूला केली. मात्र, या घटनेमुळे मेट्रो काम सुरू असताना घेण्यात येणार सुरक्षा सक्षम आहे का? जर मोठी दुर्घटना घडली असती तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल ठाणेकर विचारत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com