अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मॉरिसकडे बंदुकीचा परवाना नसल्याचं स्पष्ट

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरण; मॉरिसकडे बंदुकीचा परवाना नसल्याचं स्पष्ट

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण या गोळीबारात अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला आहे. घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडणारा मॉरिस याने स्वत:ला देखील गोळ्या झाडल्या. मॉरिसने आधी त्याच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर फेसबुक लाईव्ह केलं. त्यांनी समाजासाठी आम्ही एकत्र आल्याचं म्हटलं. अभिषेक घोसाळकर यांचं बोलणं संपवून उठत असताना त्यांच्यावर अचानक गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसनंही स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या.

याच पार्श्वभूमीवर आता परवानाधारक शस्त्रांचा प्रश्न ऐरणीवर आलाय. मॉरिसकडे असलेले शस्र हे परवानाधारक नसल्याचं स्पष्ट झालं आहे. परवाना नसताना मॉरिसकडे बंदूक आलीच कशी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com