Abdul Sattar यांच्या मुलाचा विवाह सोहळा, 'हे' दिग्गज नेते लग्नाला राहणार उपस्थित
अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील बड्या नेत्यांची या विवाह सोहळ्याला हजेरी लागणार आहेत. या विवाह सोहळ्यासंदर्भात बोलताना सत्तार यांनी घरातील हा शेवटचा विवाह सोहळा असल्याने साधारण पण चांगल्या पद्धतीने आपण करत आहोत मात्र यावर विरोधकांनीं टीका केली तरी ती आपण आहेर म्हणून स्वीकारू असेही त्यांनी म्हटलंय.
अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांचे धाकटे चिरंजीव आमेर सत्तार यांचा शाही विवाह सोहळा आज होणाऱ आहे. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मंत्री छगन भुजबळ, शुंभुराज देसाई ,गुलाबराव पाटील,केंद्रीय मंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे,यांच्या सह अनेक आजी माजी आमदार या विवाहसोहळ्याला हजेरी लावणार आहेत.
या विवाह सोहळ्यासाठी 25000 लोकांच्या जेवणाची सोय केली असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटले दरम्यान आपल्या घरातील हा शेवटचा विवाह सोहळा असल्याने साधारण पण चांगल्या पद्धतीने आपण करत आहोत मात्र यावर विरोधकांनीं शिव्या(टीका) झालीच तरी ती आपण आहेर म्हणून स्वीकारू असेही त्यांनी म्हटलय.
दरम्यान या विवाह सोहळ्याच्या विरोधकांच्या संभाव्य टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी विरोधकांनी शिव्या जरी दिल्या तरी त्या आहेर म्हणून स्वीकारणार,त्यामुळे लग्नाला आहेर करू नका आम्ही तुमच्या शब्दांचाच आहेर म्हणून स्वीकारु असल्याचे देखील अब्दुल सत्तार यांनी म्हटले
याशिवाय आज या विवाह सोहळ्याला उपस्थित न राहू शकलेल्या मंत्री आणि नेत्यांचा उलेमा अर्थात रिसेप्शनचा 21 तारखेचा सिल्लोड येथे कार्यक्रम आयोजित केला आहे.