महाराष्ट्र
बारामतीतील नमो महारोजगार मेळाव्यावर आपचा आक्षेप
बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा पार पडणार आहे.
बारामतीत आज नमो महारोजगार मेळावा पार पडणार आहे. या महारोजगार मेळाव्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. बारामती येथे राज्य शासनाच्या वतीने नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता या नमो महारोजगार मेळाव्यावर आपने आक्षेप घेतला आहे. सहभागी कंपन्यांवरच आपकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे. मेळाव्यात सहभागी झालेल्या काही कंपन्यांची माहिती इंटरनेटवर सापडत नसल्याचाही आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.
रोजगाराच्या नावाखाली 30 हजार ट्रेनींची पदे भरली जात आहेत. असा आरोप आपचे नेते विजय कुंभार यांनी केला आहे. या रोजगार मेळाव्यातील सहभागी कंपन्यांवरच आम आदमी पक्षाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.