महाराष्ट्र
Ambarnath: चोवीस तास अनवाणी पायाने धावला अंबरनाथमधील तरुण
अंबरनाथमध्ये राहणारा तरुण राजु गौडा याने एशिया बुक ऑफ रेकॉड मधील बेअरफूट रनिंग म्हणजेच चोवीस तास अनवाणी पायाने धावण्याच्या स्पर्धेतील विक्रम मोडण्याचा प्रयत्न करून तब्ब्ल 169 किमी अंतर 24 तासात धावत पूर्ण केलं आहे.
अंबरनाथमध्ये राहणारा तरुण राजु गौडा याने एशिया बुक ऑफ रेकॉड मधील बेअरफूट रनिंग म्हणजेच चोवीस तास अनवाणी पायाने धावण्याच्या स्पर्धेतील विक्रम मोडण्याचा प्रयत्न करून तब्ब्ल 169 किमी अंतर 24 तासात धावत पूर्ण केलं आहे. राजुने अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरापासून आपल्या प्रवासाला सुरुवात केली.
अंबरनाथ ते लोणावळा बस डेपो आणि पुन्हा अंबरनाथ असा अनवाणी पायाने धावत प्रवास करून त्याने आपला नविन विक्रम प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी राजुने तीन महिने सराव करून 24 तासात 169 किमी अंतर पूर्ण केलं. राजू अंबरनाथमध्ये येताच त्याच स्वागत करण्यासाठी अंबरनाथ विधानसभेचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार डॉ.बालाजी किणीकर, उमेश गुंजाळ, युवासेनेचे निखिल चौधरी यांनी त्याच स्वागत केलं. राजुला हा प्रवास करण्यासाठी बंगाली संघ अंबरनाथने विक्रमासाठी प्रोत्साहन दिलं.