महाराष्ट्र
Pune : पुण्यातील पुराच्या अभ्यासासाठी महापालिकेतील अधिकाऱ्यांची त्रिस्तरीय समिती स्थापन
पुण्यात मुसळधार पाऊस पडला.
अमोल धर्माधिकारी, पुणे
पुण्यात मुसळधार पाऊस पडला. खडकवासला धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने एकता नगरमध्ये पाणी शिरल्याने पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
याच पार्श्वभूमीवर आता पुण्यातील पुराच्या अभ्यासासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांची ही त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
ही समिती पुण्याच्या पुराच्या कारणांचा अभ्यास करणार असून समिती 7 दिवसांत अहवाल प्रशासनाला सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर पूर परिस्थितीवर कायमस्वरूपी नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.