शाळेला कंपाउंड बांधा; चौथीतील विद्यार्थ्याची आमदाराकडे मागणी

शाळेला कंपाउंड बांधा; चौथीतील विद्यार्थ्याची आमदाराकडे मागणी

चिमुरड्याच्या या मागणीमुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Published on

संजय देसाई | सांगली : जतचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विकास कामांच्या उद्घाटनाचा धडका सुरु केला आहे. याच कामाच्या उद्घाटनासाठी सुसलाद येथे ते गेले असता जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका चिमुकल्याने आमदार साहेब आमच्या शाळेला कंपाऊंड बांधुन द्या, अशी मागणी केली होती. चिमुरड्याच्या या मागणीमुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शाळेला कंपाउंड बांधा; चौथीतील विद्यार्थ्याची आमदाराकडे मागणी
काँग्रेसची भारत जोडो यात्रा 'या' कारणामुळे तीन दिवस स्थगित

जत तालुक्यातील सुसलाद येथे विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी विक्रमसिंह सावंत गेले होते. त्याच वेळी इयत्ता चौथी मध्ये शिकणारा अवधूत चव्हाण हा शाळकरी विद्यार्थी सावंत यांच्या मागे मागे येऊ लागला. उद्घाटनच्या ठिकाणी येताच आमदार सावंत यांच्याकडे कुतूहलाने तो पाहू लागला.

बाळ काय पाहिजे, असे आमदार सावंत यांनी मुलाला विचारले असता आमदार साहेब मला काही नको आमच्या जिल्हा परिषद शाळेला कंपाउंड बांधून द्या, अशी विनंती त्याने केली. हे ऐकताच आमदार विक्रमसिंह सावंतही चकित झाले. यामुळे उपस्थितांमध्ये एकच गोंधळ उडाला होता. मात्र, आमदारांनी चिमुरड्याची दखल घेत तात्काळ आमदार फंडातून कंपाउंड मंजूर केले. दरम्यान, या उद्घाटनच्या वेळी चिमुकल्या अवधूत चव्हाण याने मात्र सर्वांचे मने मात्र जिंकली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com