आधारकार्ड नसल्याने गर्भवती महिलेला दाखवला बाहेरचा रस्ता; ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

आधारकार्ड नसल्याने गर्भवती महिलेला दाखवला बाहेरचा रस्ता; ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला केवळ आधार कार्ड नसल्याने बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Published on

संजय राठोड| यवतमाळ : मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या गर्भवती महिलेला केवळ आधार कार्ड नसल्याने बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, जनहित कल्याण संघटना व क्रांती युवा संघटना त्या महिलेच्या मदतीसाठी धावून आली. तिला लोढा हॉस्पिटलमध्ये तात्काळ भरती केले. व तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला.

शहरात आंबेडकर चौक परिसरात सोळंके कुटूंब रस्यावर लोखंडी वस्तू तयार करण्याचा व्यवसाय गेल्या अनेक दिवसांपासून करत होते. दरम्यान, अर्चना सोळंके या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या वेदना सुरु झाल्या. वेदना कळा असह्य होत असल्याने तिच्या कुटूंबानी तिला घेऊन थेट ग्रामीण रुग्णालय गाठले. परंतु, आधार कार्ड नसल्याने तिला परत पाठविण्यात आले. अर्चनाच्या वेदनेला पाहून तिचे कुटूंब इकडे-तिकडे शहरात फिरून मदतीची भीक मागत होते. परंतु, तिच्या मदतीला कोणीच पुढे आले नाही.

दरम्यान, ही बाब जनहित कल्याण संघटना मारेगाव व क्रांती युवा संघटना वणीच्या पदाधिकाऱ्यांना लक्षात येताच कुठलाच विलंब न करता त्यांनी थेट वणी येथील प्रसिद्ध लोढा हॉस्पिटलमध्ये अर्चना सोळंकेला भरती केले. महिलेची प्रसूती झाली असून, दोघेही सुखरूप आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com