महाराष्ट्र
25 हजार स्केअर फुटात रांगोळीतून साकारले छत्रपती शिवरायांचे पोट्रेट
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज 393 वी जयंती राज्यभरात जल्लोषात साजरी होत आहे.
विकास माने | बीड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज 393 वी जयंती राज्यभरात जल्लोषात साजरी होत आहे.
याचनिमित्त बीडच्या माजलगाव येथील सुंदरराव सोळंके महाविद्यालयात तब्बल 25 हजार स्केअर फुटात छत्रपती शिवाजी महाराजांचे पोट्रेट रांगोळीच्या माध्यमातून साकारण्यात आलंय.
परभणीतील छत्रपती आर्ट ग्रुपने हे शिवरायांचं पोट्रेट रांगोळीच्या माध्यमातून साकारले.
तर आठ कलाकारांनी या पोट्रेटसाठी दिवस-रात्र मेहनत केली.
या पोट्रेट रांगोळीला तब्बल पाच दिवस लागले आहेत.
या 25 हजार स्केअर फुटातील पोट्रेटसाठी 50 क्विंटल रांगोळी आणि दहा कलरचे नमुने लागले आहेत.
आकर्षक शिवरायांचं पोट्रेट सर्वांचं लक्ष वेधून घेतंय.
त्यामुळे माजलगाव शहरातील शिवप्रेमी हे पाहण्यासाठी आवर्जून येथे येत आहेत.