महाराष्ट्र
कृषी आयुक्त कार्यालयात शिपायाने महिला अधिकाऱ्याला मिठी मारत केला विनयभंग
विनयभंग प्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
चंद्रशेखर भांगे | पुणे : राज्याच्या कृषी आयुक्त कार्यालयात शिपायाने महिला अधिकाऱ्याला मिठी मारत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. स्वप्निल भोसले असे मिठी मारत विनयभंग करणाऱ्या शिपायाचे नाव आहे.
पीडित महिला अधिकारी या कृषी आयुक्त कार्यालयात अधिकारी पदावर कार्यरत असून आरोपीही त्याच कार्यालयात शिपाई म्हणून काम करतो. आरोपी स्वप्नील हा महिला अधिकाऱ्याला त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न करेल, अशी चिठ्ठी लिहीत होता. याचा जाब विचारण्यासाठी महिला अधिकारी गेली असता आरोपीने महिला अधिकाऱ्याचा हात पकडला व मिठी मारत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.